
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड :- नांदेड शहरातील अतिशय नामांकित व नावलौकिक असलेले व गुणवत्तेचे शिखर गाठलेले श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड , कॉलेज होय. याच कॉलेजमध्ये दिनांक 07 फेब्रुवारी 2022 रोजी भारताची गानकोकिळा स्वर सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे कालच मुंबई येथे निधन झाले असल्याने आज कॉलेज प्रशासनाच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली.
तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी , त्याग , समर्पण आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या नऊ कोटी दलीतांच्या मातोश्री त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने कोटी कोटी नमन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर नांदेड चे नवनिर्वाचित मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधीर भाऊ कुरुडे शालेय समिती सदस्य सूर्यकांत कावळे कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक माधव ब्याळे . कोठा इन्चार्ज प्रा .सय्यद जमील अहमद सांस्कृतिक विभागप्रमुख कान्हेगावकर स्वाती , ज्येष्ठ प्रा. वसंत राठोड , प्रा.अमर दहीवडे , प्रा.यानभुरे जयवंत , प्रा. कैलास पतंगे, प्रा. शिवशंकर देशमुख , प्रा. कपिल सोनकांबळे , प्रा. मोरेश्वर निलेश , प्रा.मोरे गोविंदराव , श्री लाडेकर पंडित ,प्रा.लुंगारे ज्ञानेश्वर , प्रा.योगेश दिग्रसकर , प्रा.जामकर दिपाली , प्रा.कळसकर रुपाली , प्रा.दुल्हेवाड वैशाली , प्रा.पारेकर शिल्पा , प्रा.स्वामी संगिता , प्रा जाधव प्रतिभा , प्रा.नवघरे रत्नमाला , प्रा.शेख रेश्मा , श्री बालाजी निरपणे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.