
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी
गुणाजी मोरे
जांब :- जांब बु.येथील ग्रामदैवत हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार व शिखर बांधकाम ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्यातून करण्यात आले आहे .याचा कलशारोहण कार्यक्रम परिसरातील संत व महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.7/2/2022 रोजी चैतन्यदायी व उत्साही वातावरणात संपन्न झाला आहे. कलशारोहण कार्यक्रमाच्या सोहळ्याला हरिभक्त परायण नामदेव महाराज यांच्या हस्ते आज महापूजा व कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्व जांब व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या सोहळ्यामुळे जांब नगरी व परिसरातील भाविक भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या सोहळ्याला जांब नगरी व परिसरातील बाहेरगावी कामानिमित्त गेलेल्या लोकांची सुद्धा आवर्जून उपस्थिती पाहायला मिळाली.