
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी आर्णी
श्री. रमेश राठोड
आर्णी :- आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा शहीद ज्ञानेश्वर आडे बहुउद्देशीय संस्था कृष्णानगर यांच्यावतीने ७ फेब्रुवारी सोमवार रोजी साई मंगल कार्यालय सावली सदोबा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री. मिनू पाटील बाळासाहेब शिंदे हे उपस्थित होते तर मेळाव्याचे उदघाटक म्हणून पारवा पोलीस स्टेशनचे कार्यशील कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री. विनोद चव्हाण साहेब हे उपस्थित होते, या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक तथा मेंटर लीडर, मल्टी स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर राळेगाव चे श्री. प्रमोद कांबळे सर यांची उपस्थिती होती.
सावळी सदोबा व परिसरातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांना नोकरी व रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी या हेतूने शहीद ज्ञानेश्वर आडे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने वीरपत्नी श्रीमती कुंतीताई ज्ञानेश्वर आडे माजी सरपंच केळझरा , श्री. ज्ञानेश्वर आडे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी, यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याला विशेष सहकार्य यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांचे लाभले.
रोजगार मेळाव्याला उपस्थित युवक-युवतींना पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सावळी सदोबा व परिसरातील आठवी पास पासून ते पुढे शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींना रोजगाराची संधी निर्माण होईल अशा पद्धतीने प्रशिक्षण आपण देऊ असे आश्वासन प्रमोद कांबळे यांनी सर यांनी यावेळी दिले. यावेळी मुबारक तंवर , मिनू पाटील शिंदे, विरपत्नी कुंतीताई आडे , तसेच सावळी सदोबा गावच्या सरपंच अंजनाताई गेडाम या मंचकावर विराजमान होत्या. या मेळाव्याचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन वैभव कांबळे यांनी मानले.