
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा :- भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवानिमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार व विविध सामाजिक संस्थांनी आयोजलेल्या ७५ कोटी सूर्यनमस्कार उपक्रमा अंतर्गत सनिज् स्प्रिंग डेल स्कुल भंडारा येथे दि १४ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सव्वा लाख सुर्यनमस्कारांच्या आहुत्या या उपक्रमात अर्पण केल्या. या उपक्रमा अंतर्गत रथसप्तमी निमित्त मुलामुलींचे सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.तत्पुर्वी कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दरम्यान शाळेच्या शिक्षिका स्वरा माटूरकर यांनी “मेरी आवाज ही पहचान है,गर याद रहे” हे गाणं गाऊन भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.त्यानंतर समंत्र सूर्यनमस्कार स्पर्धेला सुरवात करण्यात आली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.रामकृष्णजी बीसने,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विनयजी अंबुलकर, प्राचार्या शेफाली पाल,कल्पना जांगडे,समृद्धी गंगाखेडकर उपस्थित होते.प्राची देशपांडे, रश्मी उमाळकर व राजेश गेडाम यांनी सूर्यनमस्कार स्पर्धेला सुरवात केली स्पर्धेचे परीक्षक म्हणून मा.रामकृष्णजी बिसने, मा.विनयजी अंबुलकर, कल्पना जांगडे यांनी काम केले.
या प्रसंगी आलेल्या पाहुण्यांसमोर वर्ग ९ व १० च्या विद्यार्थ्यांनी सुर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक केले यानंतर झालेल्या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला त्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक रिद्धी नशीने, द्वितीय क्रमांक सौम्या मेंढे,तृतीय क्रमांक चिन्मयी पाचघरे हिने पटकावला तर मुलांमध्ये प्रथम क्रमांक ओम हसराणी,द्वितीय क्रमांक कपिश व्यास,तृतीय क्रमांक गोकुल मदनकर याने पटकाविला. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन लीना चाचेरे, मोनाली चित्रीव,तर आभार प्रदर्शन प्रिया मेश्राम यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षा लांजेवार,प्रज्ञा घाटबांधे,मोहन दाढी,नितीन खैरकर,रमेश झंझाड यांनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.सव्वा लाख सुर्यनमस्कारांची आहुती अर्पण केल्याबद्दल शाळेचे सचिव मा.खासदार सुनील मेंढे व संपूर्ण व्यवस्थापन मंडळाने यांनी प्राचार्या शेफाली पाल,शिक्षक वृंद,व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.