
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
चेन्नई – लिलावापूर्वी चेन्नईकडे तब्बल 42 कोटी रक्कम उपलब्ध असल्याने हे घडू शकते असेही सांगितले जात आहे. यंदाच्या स्पर्धेपूर्वी अनेक खेळाडूंना नाईलाजामुळे मुक्त करण्यात आले होते. त्या खेळाडूंना संघात परत घेण्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्नशील आहोत, असे संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे. आयपीएल स्पर्धेच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज (चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आपल्या संघातून मुक्त झालेल्या मात्र, अनुभवी असलेल्या खेळाडूंना पुन्हा एकदा संघात घेण्यास उत्सुकसीएसके) आपल्या संघातून मुक्त झालेल्या मात्र, अनुभवी असलेल्या खेळाडूंना पुन्हा एकदा संघात घेण्यास उत्सुक आहे.
हा लिलाव येत्या शनिवार व रविवार या दोन दिवशी होणार असून त्यांच्यासह स्पर्धेतील अन्य संघांनाही आपलेच जास्तीत जास्त चार खेळाडू लिलावात खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार आता चेन्नईचा संघ ड्वेन ब्राव्हो, फाफ डुप्लेसी, दीपक चहर व शार्दुल ठाकूर या खेळाडूंना पुन्हा एकदा लिलावात खरेदी करू शकतात. प्रत्यक्ष लिलावात काय होइल हे सांगता येत नसले तरीही ज्या खेळाडूंना आम्ही परत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्यासाठी उपलब्ध पूर्ण रक्कम खर्च करण्याची आमची तयारी आहे, असेही संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
चेन्नई संघाने या लिलावापूर्वी चार खेळाडूंना रिटेन केले होते. त्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनी, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली आणि आयपीएलच्या गेल्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा महाराष्ट्राचा स्टार क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे.