
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
या यादीत सनथ जयसूर्या 448 सामन्यात 218 कॅच घेत पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 375 सामन्यात 160 कॅच घेतल्या आहेत. त्यानंतर भारताचा अझहरुद्दीन तिसऱ्या स्थानावर असून त्याने 334 सामन्यात 156 कॅच झेलल्या आहेत.
मुंबई :- भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडिज विरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यात महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड तोडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत विराटने सचिनचे अनेक रेकॉर्ड तोजले असून आता आणखी एक रेकॉर्ड तोडण्यासाठी विराट सज्ज झाला आहे. विराट सचिनच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या रेकॉर्डच्या जवळ पोहोचला आहे. सचिन भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्यांच्या यादीत दुसरा असून आता विराट त्याला मागे टाकू शकतो. तो सध्यातरी तिसऱ्या स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल (यष्टीरक्षकाशिवाय) श्रीलंकेचा खेळाडू सनथ जयसूर्या याच्या नावावर आहेत. तर भारताकडून या यादीत मोहम्मद अझहरुद्दीन पहिल्या स्थानावर आहे. तर सचिन दुसऱ्या स्थानावर असून विराट तिसऱ्या स्थानावर आहे. विराटने 258 वनडे मॅचमध्ये 134 कॅच घेतले आहेत. तर सचिनने 463 सामन्यांत 140 कॅच झेलले आहेत. त्यामुळे विराट सचिनपासून केवळ सहा कॅच मागे आहे. त्यामुळे आणखी सात झेल घेताच तो सचिनला मागे टाकू शकतो.