
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- सलमान खान आपल्या अॅक्शन इमेजसाठी प्रसिद्ध आहे. त्याने कॉमेडी आणि इमोशनल ड्रामा सिनेमातही भरपूर काम केलंय. पण डान्सचा विषय आला तर सलमान खानची भंबेरी उडते. सलमानन खानला तुम्ही काही खास गाण्यांवर थिरकताना पाहिलं असेल. पण करिअरच्या सुरूवातीला त्याला डान्स करण्यात अजिबात रस नव्हता आणि तो डान्स करणं टाळण्याचा प्रयत्न करत होता.
याचा खुलासा दुसरं कुणी नाही तर त्याची को-स्टार आएशा जुल्काने केला आहे. ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आएशा जुल्का एका रिअॅलिटी शोचा भाग झाली होती. यावेळी तिने सलमान खानबाबत खुलासा केला. आएशाने सलमानसोबत ‘कुर्बान’ सिनेमात काम केलं होतं. जो तिचा डेब्यू सिनेमा होता. आएशा म्हणाली की, सलमान डान्सबाबत फार नर्वस होत होता. तो नेहमीच कोरिओग्राफरला म्हणत असे की, त्याला डान्स स्टेप्स देऊ नका.
तो कोरिओग्राफरला सांगायचा की, गाण्यादरम्यान तो त्याची एन्ट्री केवळ वॉकच्या माध्यमातून द्या. आणि हिरोईनकडून डान्स करून घ्या. आएशा पुढे म्हणाली की, ती सलमान खानच्या कॉन्फिडन्सला दाद देते की, हळूहळू त्याने आपल्या डान्सिंग स्किल्सवर काम केलं आणि आता एक उत्तम डान्सरही झाला आहे.
आएशा जुल्का ‘जो जीता वही सिकंदर’, ‘दलाल’ सहीत अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमात काम केलं आहे. ती ९०च्या काळातील टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जात होती. आएशाने लग्नानंतर सिनेमात काम करणं बंद केलं होतं. तेच सलमान खानबाबत सांगायचं तर तो अखेरचा ‘अंतिम’ सिनेमात दिसला होता. आता तो ‘टायगर ३’ मध्ये कतरिनासोबत दिसणार आहे.