
दैनिक चालु वार्ता
मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा ता. ( बातमीदार ) :- आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार प्रादेशिक कार्यालयातील लेखापाल प्रफुल्ल खैरनार यांचा सेवापुर्ती सह्रदय सत्कार सोहळा आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक ( प्रशासन ) जालिंदर आभाळे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक च्या मुख्य कार्यालयात संपन्न झाला आहे. या सोहळ्यास महामंडळाचे महाव्यवस्थापक ( विपणन ) जयराम राठोड, व महाव्यवस्थापक वित्त मनोजकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुख्य कार्यालय नाशिक येथील अधिकारी, कर्मचारी व राज्यातील ईतर कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते.
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार प्रादेशिक कार्यालयातील लेखापाल प्रफुल्ल खैरनार 31 जानेवारी ला सेवानिवृत्त झाले आहे. त्यांनी लिपिक ते लेखापाल अशी 39 वर्षे ईमानेईतबारे आदिवासी भागात सेवा केली आहे. तर महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कर्मचारी संघटनेचा सदस्य ते अध्यक्ष संघटनेतील असा प्रवास करत, राज्यातील कर्मचार्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन सोडवले आहेत. कार्यालयीन सत्कारानंतर मोखाडा व खोडाला वासीयांनी देखील सेवापुर्ती सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता.