
दैनिक चालु वार्ता
लोहा (ता.) प्रतिनिधी
भरत पवार
लोहा :-कारेगाव येथील गट कृ.112 मधिल 3 हेक्टर 20 मधुन 7500 दगड गौण खणीज उत्खननासाठी व वाहतुकीसाठी में.लोहा- नांदेड -वारंगा प्रा.लि.नांदेड यांनी लोहा तहसिल कार्यालयाला परवानगी मागीतली परंतु परवानगी मिळण्यापुर्विच गट क्र.112,85,92,94,95,98 मधुन अनाधिकृतरित्या 20,000( विस हजार) ब्रास दगड उत्खनन करुन अवैद्यपणे वाहतुक करण्यात आली आहे.व एका गटात दगड गौण खनिज उत्खननाची परवानगी मागीतली परवानगी मिळाली नाही.
तोपर्यंत दुस-याच गटात दगड गौण खणीज उत्खनन करण्यात आले आहे.व तलाठी सज्जा कारेगाव यांनी व मंडळ अधिकारी सोनखेड यांनी दि.10/12/2021 रोजी तहसिलदार लोहा यांच्या निदर्शनास वरील गट क्रमांकामध्ये अनाधिकृत दगड,मुरुम गौण खनिज उत्खनन होत असल्याचे पंचनाम्याव्दारे कळविले होते तरी सदर कंपनीवर काहीच कार्यवाही केली नसल्यामुळे सदर कंपनिने वरील गटातुन अनाधिकृतपणे 20,000 ब्रास दगड,मुरुम उत्खनन केले आहे.
तेंव्हा आंबेडकर नॅशनल काॅंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड यांनी निवेदनाव्दारे वरील सर्व प्रकाराची चौकशीची मागणी केली असता तहसिल कार्यालयाने तलाठी कारेगाव व मंडळ अधिकारी सोनखेड यांना सदर चौकशीकामी दि.31/1/2022 रोजी आदेश काढण्यात आले व आदेशाप्रमाणे तलाठी ,मंडळ अधीकारी सोनखेड यांनी वरील गट क्रमांकातील दगड ,मुरुम गौण खणीज उत्खनन व वाहतुक अनाधिकृत होत असल्याचे दि.1/2/2022 रोजीच्या पंचनामा अहवाला व्दारे तहसिल कार्यालय लोहा यांना कळविले आहे.
तेंव्हा या प्रकरणी संधित कंत्राटदारावर कार्यवाही करुन 20,000 ब्रास दगड गौण खनिजची राॅयल्टी भरुन घ्यावी व कारेगाव येथे अनाधिकृतपणे होत असलेले दगड,मुरुम गौण खनिज उत्खणन तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकर नॅशनल काॅंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड यांचे लोहा तहसिल कार्यालया समोर दि.8/2/2022 रोज मंगळवार पासुन बेमुदत अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनाव्दारे लोहा तहसिल कार्यालयाला कळविले आहे.