
दैनिक चालु वार्ता
भिगवन प्रतिनिधि
जुबेर शेख
भिगवण :- भिगवण ग्रामपंचायत च्या माध्यमातून प्लास्टिक बंदी असताना रोटरी सखी तर्फे पारंपारिक हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात प्लास्टिकचा वापर न करता एक पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांचे वान देण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन रेखा खाडे, दिपाली भोंगळे, वैशाली बोगावत, नीलिमा बोगावत,ललिता वाकसे, डॉ. शिवराणी खानावरे, तेहमिन शेख , मिनाताई बंडगर यांनी केले.
सध्या प्लास्टिक प्रदूषण हे ग्लोबल वॉर्मिंगच्या विनाशकारी परिणाम पैकी एक मुख्य कारण आहे. प्लास्टिक मुळे पर्यावरणाला हानिकारक नाही तर पृथ्वीवरील जीवनावरही परिणाम होत आहे आणि जर हे येत्या काळात असेच चालू राहिले तर परिस्थिती खूपच बिकट होईल. प्लास्टिक पिशव्या भांडी आणि फर्निचर यांच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिक कचरा यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे तसेच त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही खूप अवघड होत आहे.
प्लास्टिकच्या अतिरेकी वापराने प्रदूषणात दिवसेंदिवस भयंकर वाढत आहे अनेक नाल्या गटारांमध्ये प्लास्टिक अडकून पडल्याने सांडपाणी तुंभते व साचते तसेच अनेकदा प्लास्टिक मधून खाद्यपदार्थ फेकण्यात येत असल्यामुळे हे प्लास्टिक खाऊन गाय मशी सारखे अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत ,याचा सर्व विचार करून रोटरी क्लब ऑफ भिगवन तर्फे रोटरी सखींनी एक फूल ना फुलाची पाकळी मदत म्हणून पारंपारिक हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात एक कापडी बॅग वाण म्हणून असे जवळपास 460 कापडी पिशव्यां चे वाटप केले आणि त्याचे महत्व सर्व उपस्थित महिलांना पटवून दिले.
या कार्यक्रमासाठी निशिगंधा कुदळे, रत्नमाला रायसोनी, दीपिका क्षिरसागर, स्मिता भोंग, पुजा हुलगे, सविता सोनावणे, सपना गांधी, शुभांगी रायसोनी, अश्विनी गांधी, शारदा कांबळे, स्मिता बोगावत, शितल जांबले, डॉ. स्मिता खानावरे, डॉ. पूनम रेनुकर, मोनिका गाढवे, आशा चौधरी, ज्योती नहाने इत्यादि रोटरी सखी उपस्थित होत्या व सेक्रेटरी सुषमा वाघ यांनी सर्वांचे आभार मानले.