
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रूग्णालय नांदेड च्या वतीने मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ एस.आर.लोणीकर ग्रा. रु. कंधार, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा “मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रम” याच्या सौजन्याने सर्व जनतेस कळविण्यात येते की
दि:-15/ 02/2022 रोजी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे “ताण तणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिर”याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व जनतेने या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, या शिबिरात खालील मानसिक समस्या व आजारावर उपचार केले जातील.
चिंता, नैराश्य, झोप न येणे, व्यसनाधीनता, जुनाट डोकेदुखी, झटके येणे, करणी,भानामती, स्किझोफ्रेनिया, काल्पनिक आवाज ऐकू येणे, अकारण बडबड, मतिमंदत्व, विस्मरण,लहान मुलांमधील किंवा शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेले मानसिक ताण- तणाव, तसेच अनेक मानसिक आजार व समस्येवर नांदेड येथील मानसोपचार तज्ञांमार्फत मोफत तपासणी, औषधोपचार व समुपदेशन केले जातील. तरी संबंधित समस्या व आजार असलेल्या आपल्या जवळील नातेवाईक, मित्र तसेच कंधार शहरातील व गावातील सर्व लोकांना शिबिराबाबत माहिती देऊन सहकार्य करावे.
स्थळ ग्रामीण रुग्णालय, कंधार
दि.15/ 02/22
वेळ :-सकाळी 09 ते दुपारी 01
संपर्क व नाव नोंदणी
डॉ लक्ष्मीनारायण पवार +918600134187
श्रीमती भुरके +919860476066
श्री अरविंद वाठोरे 918793678274
नांदेड येथील तज्ञ डॉक्टर येणार आहेत तरी सर्व सुजाण नागरिकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आव्हान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस आर लोणीकर सर यांनी केले आहे.