
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
जुन्नी :- योगगुरू श्री हरिओम बाबा यांच्या प्रेरणेतून महावैष्णव विश्व विभुषीत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आशिर्वादाने पावण सिद्ध समाधी स्थळ मौजे,जुन्नी ता. धर्माबाद येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी १०/०२/२०२२ ते १७/०२/२०२२ पर्यंत अखंड हरिहर नाम सप्ताह व ग्रंथराज पारायण भागवत कथेचे आयोजन केले आहे. मार्गदर्शक व प्रेरणा हरीओम बाबा उत्तरकाशी,साध्वी शिवदासी माई व श्री ह.भ.प.नामदेव महाराज पेठवडजकर (भागवत प्रवक्ते) यांच्या मधुर वाणीतून दररोज भागवत कथा तसेच नामवंत कीर्तनकाराचे किर्तन १०/०२/२०२२ गुरूवार श्री. ह. भ.प. व्यंकट महाराज हाडोळीकर,११/०२/२०२२ शुक्रवार श्री. ह. भ.प.अनिरुध्द महाराज बाऱ्हाळीकर,१२/०२/२०२२ शनिवार श्री. ह.भ.प. संतोष महाराज कुशावाडीकर, १३/०२/२०२२ रविवार श्री. ह.भ.प. भगवान महाराज महाळंगीकर,१४/०४/२०२२ सोमवार श्री. शि.भ.प. मोहन गुरुजी कावडे हसनाळीकर, १५/०२/२०२२ मंगळवार श्री. ह.भ.प. बळी महाराज सुगावकर,१६/०२/२०२२ बुधवार श्री. ह.भ.प. योगेश महाराज अग्रवाल वसमतकर, १७/०२/२०२२ गुरूवार श्री. ह.भ.प. योगेश महाराज अग्रवाल वसमतकर यांचे काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसाद होणार आहे.दि.१७/०२/२०२२ रोजी आमदार राजेशजी पवार साहेब (नायगाव विधानसभा) व सौ. पुनमताई पवार(जि.प.सदस्या) यांच्या तर्फे होणार आहे. या सप्ताहासाठी सर्व भाविक नागरिकांना उपस्थित राहण्याची विनंती समस्त गावकरी मंडळी, जुन्नी यांनी केली आहे.