
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती:- बडनेरा नविवस्ती भागांमध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये चोरीच्या घटनेच्या प्रमाणात अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाचे या चोरांवर अंकुश लावण्यात असमर्थ ठरीत असल्याचे सुद्धा समजून येत आहे काही दिवसा अगोदर बडनेरा मधील नवीवस्ती भागातील यवतमाळ रोड स्थित गजानन महाराज मंदिर आणि त्याआधी श्रीराम मंदिर येथील दानपेटी आणि आता तर चक्क आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावरील डॉक्टर विधळे यांच्या दवाखाना समोरील हनुमान मंदिराची दानपेटी फोडून नेल्याची घटना बुधवारच्या मध्यरात्रीला घडली असून या संदर्भातली माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
बडनेरा नविन वस्ती भागांमध्ये होणाऱ्या या चोऱ्यांवर पोलिसांचे नियंत्रण का नसावे?याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तर चोरांचा शोध घेण्याकरिता बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये विशेष पथक असून या पथकाला अपयश का मिळत आहे.याची चर्चा सर्वत्र केली जात आहे;कारण पंधरा दिवसाच्या कालामध्ये दोन ते तीन मंदिराच्या पेट्या फोडून चोरीचा प्रकार हा बडनेरा शहरात उजागर झालेला आहे.अद्यापही या चोरांचा पत्ता लागलेला नाही,त्यामुळे बडनेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोट उचलल्या जात आहे.
सदर प्रकरणाची तक्रार मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवीन्यात आली असून तक्रार प्राप्त होताच बडनेरा पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन मंदिराची पाहणी आणि तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासणी केली असुन सदर प्रकरणाचा चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला.पुढील तपास बडनेरा पोलीस करीत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.