
दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
भोरखेडा :- आर. सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालय, भोरखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना एकक च्या वतीने इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींसाठी करिअर मार्गदर्शन व इयत्ता बारावी नंतरच्या संधी या विषयावर एच.आर. पटेल महिला महाविद्यालय, शिरपूर येथील प्राचार्या डॉ श्रीमती शारदा शितोळे मॅडम यांनी विद्यार्थिनींना भविष्यातील महिलांसाठी असलेल्या व्यवसाय संधी विषयी सविस्तर माहिती करून दिली तसेच आर्थिक दृष्टीने मागासवर्गीय विद्यार्थिनींना विविध शिष्यवृत्ती योजना विषयी मार्गदर्शन केले.
यामुळे वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणापासून कोणतीही विद्यार्थिनी वंचीत राहणार नाही यासाठी महाविद्यालयात असलेल्या योजनांविषयी माहिती दिली यावेळी माजी विद्यार्थीनी प्रा डॉ सौ इंदिरा गिरासे यांनी आपले अनुभव व्यक्त केले. यावेळी डॉ हेमकांत चौधरी, विद्यालयाचे प्राचार्य श्री आर एफ शिरसाठ सर , श्री. एस. एम. पाटील सर, श्री. पी.टी. चौधरी श्री. व्ही. एस.ईशी, श्री.व्ही डी. पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री एन वाय बोरसे यांनी केले.