
दैनिक चालु वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
पंढरपुर :- पंढरपूर तालुका पोलीस ठाणेची दमदार कारवाई. १३२ किलो ९०० ग्रॅम सुगंधी चंदन किंमत ७, ९७,४००/- व एक सिल्हर रंगाची एरटिगा कार किंमत ५,००,००/- असे एकुण १२,९७,४०० किंमतीचा माल जप्त मंगळवार दि८फेब्रुवारी रोजी सायंकाळी७ वाजणेच्या सुमारास चंदन चोरांना पकडण्यात तालुका पोलिसांना यश आले. गोपनिय माहितीनुसार, पेनूर ता. मोहोळ येथून एक सिल्व्हर रंगाची इटीका कारनं एमएच ४२ के ७६११ मधुन दोन इसम पोत्यामध्ये सुंगधी चंदनाची ओली लाकडे घेवुन पंढरपूर कडे येणार असलेबाबत बातमी मिळाली.
नंतर सदरबाबत माहिती वनविभाकडील सरकारी वाहन क्र एम एच १३ ए एक्स ९१६८ मधुन वनपाल एस एस पतकी मडम, वनरक्षक एस डी कांबळे व वाहन चालक बी टी वाघमारे असे पोलीस ठाणेस हजर झाले. त्यानंतर पोक/२१३१ सर्वे हे दोन शासकिय पंच, पोलीस स्टफ, वन विभागाचे अधिकारी स्टफ, पंच व वजनकाटाधारक वजनकाटयासह पंढरपूर मोहोळ रोडवरील तीन रस्ता चौकातील इंडीयन ऑईल पेट्रोल पंपासमोर रोडचे बाजुस वाहने लावुन रोडला बॅरिगेट्स लावुन मोहोळ बाजुकडून येणारे वाहने थांबवुन त्याची बारकाईने तपासणी करीत असताना मोहोळ बाजुकडून येणारी पाच-सहा वाहने तपासली त्यानंतर एक कार वेगात येताना दिसली सदर कार थांबवुन तिची पाहणी केली असता मा. पोलीस निरिक्षक सो यांना मिळालेल्या बातमीतील माहितीप्रमाणे सदर सिल्व्हर रंगाची इर्टीका कार नंबर एम एच ४२ के ७६११ असल्याचे दिसले लागलीच सदरची कार गाडी रोडच्या बाजुस घेवुन तपासणी करीत असताना सदर गाडीमध्ये चार पांढरे नायलनची पोती आढळुन आली.
त्याची वनपाल यांचे समक्ष पाहणी केली असता सदर नाईलन पोत्यामध्ये मंद सुंगधी वासाचे ओली चंदनाची लाकडे असल्याचे वनपाल एस एस पतकी मडम व वनरक्षक एस डी कांबळे यांनी पंचा समक्ष सांगितले लागलीच इर्टीगा चालक व त्याचे सोबत असलेल्या इसमास त्यांचे नाव पत्ते विचारता त्यांनी आपली नावे चालक १) रमेश महादेव तेलंग वय २५ वर्षे रा. तुंगत ता. पंढरपूर २) कचरुददीन अल्लामीन जमादार वय ३५ वर्षे रा. पेनूर ता. मोहोळ असे असल्याचे सांगितले. सदर इटीका कार पकडली ती वेळ २३:१५ वा ची होती. त्यानंतर वनपाल एस एस पतकी मडम व वनरक्षक एस डी कांबळे यांचे उपस्थितीत सदरचा रस्ता रहदारीचा असल्याने रस्त्यावर सर्व माल उतरून पंचनामा करणे शक्य होत नसल्याने दोन पंच, कार चालक व त्याचे बरोबर असलेल्या व्यक्तीस पोलीस ठाणेस घेवून येवून सर्व माल वरून त्याची पाहणी केली असता एकुण चार पोत्यामध्ये मंद सुंगधी वासाची चंदनाचे ओली लाकडे मिळून आली .
१) २,३१,०००/- एक पांढ-या रंगाचे नायलनच्या पोत्यामध्ये सुंगधी चंदनाची ओली लाकडे त्याचे वजन ३८ किलो ५०० गम वजनाची किंमत अंदाजे २)१,५४,२००/- एक पांढ-या रंगाचे नायलनच्या पोत्यामध्ये सुंगधी चंदनावी ओली लाकडे त्याचे वजन २५ किलो ७०० गम वजनाची किंमत अंदाजे
३)१,८८,४००/- एक पांढ-या रंगावे नायलनच्या पोत्यामध्ये सुंगधी चंदनाची ओली लाकडे त्याचे वजन ३१ किलो ४०० गम वजनाची किंमत अंदाजे
४) २,२३,८००/- एक पांढ-या रंगावे गायलनव्या पोत्यामध्ये सुंगधी चंदनाची ओली लाकडे त्याचे वजन ३७ किलो ३०० गम वजनाची किंमत अंदाजे ५) ५,००,०००/- एक सिल्व्हर रंगाची इटीका कार नं एम एच ४२ के. ७६११ किमंत अंदाजे. १२,९७,४००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर बाबत पंढरपुर तालुका पोलीस ठाणे गुरंन ९० / २०२२ कलम ३७९, ३४ यह भारतीय वन अधिनिअम १९२७ चे कलम ४१, ४२, ६६. ६६(अ) व महाराष्ट्र नियमावली २०१४ नियम ८२ व महाराष्ट्र वन अधिनिअम कलम १२९ प्रमाणे कायदेशीर फिर्याद अन्वये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदरची कामगीरी ही मा. पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री हिम्मत जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम कदम सो, यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपुर मिलिंद पाटील, सपोनि शंकरराव ओलेकर, पोहेकॉ १०२४ ढवळे, पोहेकॉ १५३८ चंदनशिवे, पोना १७२८ यजगर, पोना १६०८ माळी, पोकॉ २१३१ सुर्वे, पोको १०९३ जगताप व वन विभागाकडील श्रीमती पत्की, वनपाल पंढरपुर विभाग व वगरक्षक एस.डी. कांबळे या पथकानी बजावली पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक गोंदे हे करीत आहेत.