
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.9 मलकापूर :- लोकसभेमध्ये- प्रश्न उत्तराच्या तासांमध्ये काँग्रेसच्या खासदार मोईना मिश्रा यांनी जैन समाजाबद्दल व जैन नवयुवका बद्दल आक्षपार्ह विधान केल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी व त्यांनी संपूर्ण जैन समाजाची माफी मागावी यासाठी निवेदन दि. 8 फेब्रुवारी रोजी माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्यावतीने उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की तृणमूल काँग्रेस खासदार यांनी सुरू असलेल्या लोकसभेच्या अधिवेशनात प्रश्न उत्तराच्या तासादरम्यान लोकसभेत जैन समाज हा अहिंसा परमो धर्म या युक्ती वर चालणारा धर्म आहे पण जर कोणी अशी बेजबाबदार आणि खालच्या स्थळाचे वक्तव्य कोणी करत असेल तर जैन समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तसेच लोकसभेच्या फलाटावरून हे शब्द काढण्यात यावे ही मागणी निवेदन द्वारे करण्यात आली.
निवेदन देतेवेळी भाजप नेते शिवचंद्र तायडे, जिल्हा महामंत्री मोहन शर्मा, शहराध्यक्ष मिलिंद डवले, भाजप जैन प्रकोष्ठ प्रदेश सचिव डॉ. योगेश पटणी, शहर उपाध्यक्ष संतोष बोंबटकार, रुपेश श्रीमल, शरद मांडवीया, भूषण भीम जियानी, विजय डागा, डॉ. मुकेश जैन, अजय नांदुरकर, नितीन वैद्य, निरखे, यांच्यासह आदी उपस्थित होते.