
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
सुशिल घायाळ
मंठा :- आज दिनांक 08-02-2022 रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघ मंठा शहर यांच्यावतीने मीटिंग आयोजित केली होती ही मिटिंग जालना जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री महादेव जी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली ठेवली होती या मिटिंग मध्ये रविदास महाराज जयंती उत्सव समिती मंठा अध्यक्षपदी श्री सोपानराव वाघमारे सर यांची निवड करण्यात आली व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मंठा तालुका अध्यक्ष माननीय श्री अंबादास घायाळ यांची तसेच ता.उपाध्यक्ष पदी श्री हरीभाऊ वाघमारे व लक्ष्मणराव टोम्पे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
श्री प्रभू शिंदे सर यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ कर्मचारी तालुका अध्यक्षपदी पुनश्च निवड करण्यात आली मंठा शहराध्यक्षपदी विजय अंभोरे राष्ट्रीय चर्मकार युवा महासंघ मंठा तालुका अध्यक्षपदी सचिन शिंदे शहराध्यक्षपदी परसराम सोनटक्के व जयंतीची पूर्ण कमीटी ठरविण्यात आली या प्रसंगी सुहाशराव कांबळे ,बन्नु अहिरे,बळीराम वाघमारे सर,दत्ता वाघमारे ,रामेश्वर गवळी,भगवान अंभुरे,आसाराम वाघमारे ,गोविंद वाघमारे, शिवाजी वाघमारे ,हरीकीशन वाघमारे ,खंडू लहाने ,संजय हानवते,गजानन कांबळे,विठ्ठल जिगे,रामेश्वर संपत वाघमारे ,उमाकांत ठोंबरे ,सुशिल घायाळ आदी चर्मकार समाज बांधव उपस्थित होता.