
दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादा लोखंडे
नांदेड :- नांदेड येथील श्री पुरुषोत्तम गंगाधरराव रणवीरकर हे स्टेनोग्राफर या पदावर ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथून दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत झाले आहेत. त्यांच्या एकूण सेवेतील २७ वर्षे कालखंड नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अविरत सेवेत गेलेला आहे.
त्यांचे व्यक्तीमत्व अत्यंत प्रसन्न व मितभाषी असून त्यांच्या सेवेतील गुणवत्तेमुळे व शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भौतिक सुविधा , इमारत रचना व शैक्षणिक गुणवत्ता उत्कृष्ट असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या शुभ करकमलाद्वारे त्यांचा व तत्कालीन जिल्हा नियोजन अधिकारी मा. दि. बा. जोशी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या एकूण उत्तम सेवेचा परिणाम म्हणून प्रशासनाने त्यांना दोन जादा वेतनवाढी देऊ केलेल्या आहेत.
त्यामुळे त्यांचा सपत्नीक त्यांच्या निवासस्थानी ‘निराळी समाज सेवा समितीच्या’ माध्यमातून त्यांचा शाल ,श्रीफळ ,बुके देऊन व पेढे भरवून सत्कार करण्यात आला. व त्यांना भावी निरोगी व निरामय आरोग्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. त्याप्रंसगी उपस्थित श्री इंजि. पांडूरंग गज्जेवार , श्री नारायण पारेकर , श्री चंद्रकांत दामेकर , सौ. व श्री विनायक कळसकर , श्री मोहन कुरुडे व श्री रमेश ढगे