
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- अजित पवार हे पुण्यात नेहमीच सकाळच्या वेळेत विकासकामांचा आढावा घेत असतात. पहिल्यांदाच त्यांनी मुंबईत विकास कामांची पाहणी केली. त्यांनी महालक्ष्मी रेड क्रॉस, वरळी, धोबी तलाव याठिकाणी जाऊन पाहणी केली.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य यांनी आज मुंबईत एकाच गाडीतून प्रवास केला. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विकास कामांची दोघांनी पाहणी केली. दोन्ही नेत्यांचे सोबत असताना काही फोटोही काढण्यात आले. यावेळी काही सूचक फोटोंवर नेटकरी व्यक्त झाले आहेत.
ठाकरे आणि पवार सोबत असताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात असल्याचं सांगतलं. त्यावमुळे चर्चांना उधाण आलंय. मुंबई महापालिकेनं गेल्या वर्षी हेरिटेज वॉकची सुरुवात केली होती. तेव्हासुद्धा अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले होते. पुढे चला मुंबई अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्या दौऱ्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला अजित पवारांनी पा फोटो शेअर केल्याची आठवण काही जणांना झाली.
राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळणार असं भाजप नेते सतत बोलत असतात. दरम्यान, आता अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्रित केलेली विकासकामांची पाहणी त्या चर्चेला पूर्णविराम देणारी असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीत एका कार्यक्रमासाठी आले असताना अजित पवार यांनी कारचं सारथ्य केलं होतं. तेव्हा आमच्या सरकारचं सारथ्य अजित पवार यांच्याकडे असल्याचं उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हटले होते.