
दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
पुणे :- अटारी पुणे झोन- VIII, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र, धुळे यांचे माध्यमातून शेतकरी, पशुपालक, यांची क्षमता वाढविणे करिता किफायतशीर दुग्धव्यवसाय व पशुधन व्यवस्थापण कार्यक्रमांतर्गत तीन दिवसीय व्यापारक्षम शेळी पालन प्रशिक्षण प्रशिक्षण संपन्न. सदर प्रशिक्षण उदघाटन कार्यक्रमास प्रमुख उदघाटक मा.डॉ. चिंतामणी देवकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, धुळे, प्रमुख पाहुणे श्री. वाकचौरे साहेब, प्रमुख ,अश्वमेध मेडिकेयर, डॉ.राहुल देसले, प्राचार्य,कृषी तंत्र विद्यालय, धुळे, डॉ.दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, धुळे, प्रा. विपुल वसावे, प्राध्यापक, पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र, कृषि महाविद्यालय धुळे, डॉ.अतिश पाटील, शास्त्रज्ञ, मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, धुळे, डॉ धनराज चौधरी, शास्त्रज्ञ, पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, धुळे, अधिकारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक डॉ. दिनेश नांद्रे यांनी केले, प्रास्तविका मध्ये त्यांनी कृषी बरोबर कृषी पूरक व्यवसायाचे महत्व अधोरेखित करून शेतकरी उत्पन्न दुप्पट होण्याबरोबर शास्वत उत्पादनात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन महत्व पूर्ण भूमिका बजावत आहे याचा उल्लेख करून, कृषी विज्ञान केंद्र, राबवीत असलेल्या विविध कृषि व कृषि पूरक उपक्रमाविषयी माहिती अवगत करून दिली. उद्घाटक मार्गदर्शनामध्ये डॉ.चिंतामणी देवकर यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ राबवीत असलेल्या उपक्रमाविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच कृषि अर्थ व्यवस्थेमध्ये पशुधनाचे महत्व अधोरेखित केले व कृषी विज्ञान केंद्र राबवीत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करून शेळीपालनाचे महत्व विषद केले.
डॉ. राहुल देसले, यांनी पशुधन सध्यस्थिती, भारतीय अर्थव्यवस्थे मधील पशुधन, कुक्कुटपालनाचे महत्व आणि भविष्यातील संधी या विषयी मार्गदर्शन केले.तसेच जास्तीत जास्त तरुणांनी अश्या प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेऊन तांत्रिक माहिती घेऊन यशस्वीपणे कृषी पूरक व्यवसायाचे नियोजन करावे असे आव्हान केले. सदर तीन दिवसीय तांत्रिक चर्चा सत्रामध्ये डॉ. धनराज चौधरी, डॉ. मिलिंद भंगे, सहायक उपायुक्त, पशुसंर्धन, पशुसंर्धन व दुग्ध विभाग, धुळे, श्री.विपुल वसावे, डॉ. संदीप पोळ, प्रगतशील शेतकरी शेलीपालक श्री. भाऊसाहेब देसले, दलवाडे यांचे मार्गदर्शन लाभले यात प्रामुख्याने शेळी पालन व्यवसायाची ओळख, शेळीपालन कशाकरिता, शेळीपालनाचे फायदे, भारतातील/महाराष्ट्रतील शेळ्यांच्या जाती व त्यांचे वैशिष्टे, शेळीपालनाच्या पद्धती, शेळ्यांच्या कारदांचे संगोपन व आहारव्यवस्थापन इत्यादी, शेळ्यांचे निगा, आहार व्यवस्थापन, नर निगा, आहार व्यवस्थापन, पशु पैदास धोरण, शेळ्यांची निगा लसीकरण व रोग व्यवस्थापन, दुध व मांस खरेदी विक्री व्यवस्थापण, विविध शासकीय योजना माहिती, प्रकल्प अहवाल तयार करावयाची माहिती, गट शेती संकल्पना व महत्व, इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले सदर प्रशिक्षणामध्ये ग्रामीण युवक, शेतकरी, महिला आदी. नी मोठ्या संखेने सहभाग नोंदवला.
या प्रशिक्षणाचे संपूर्ण संचालन डॉ.धनराज चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.अतिश पाटील, यांनी मानले. चर्चा सत्र यशस्विते साठी डॉ. पंकज पाटील, श्री.रोहित कडू, श्री.जगदीश काथेपुरी, कु.अमृता राऊत, श्री.जयराम गावित,कु.प्राची काळे,कु. स्वप्नाली कौटे, श्री.स्वप्नील महाजन, श्री.बाळू वाघ, श्री.कुमार भोये, श्री. मधुसूदन अहिरे इ. कृषी विज्ञान केद्र धुळे अधिकारी,कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.