
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
जव्हार :- पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित अनुदानित आश्रम शाळा खुडेद तिवस पाडा येथील शिक्षक पंढरीनाथ तुकाराम जाधव या शिक्षकाला संस्थेकडून हेतुपूर्वक त्रास देणे सुरू असून त्यांना कामावर रुजू करीत नसल्याने आदिवासी दलित विद्यार्थी विकास परिषदेचा जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे धरणे आंदोलन करण्यात आले असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे हटणार नसल्याचे आदिवासी दलित विद्यार्थी विकास परिषद चे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्रवीण भिसे यांनी बोलताना सांगितले.
आंदोलकांनी शिक्षक जाधव यांच्या साठी जे आंदोलन केले आहे त्यामधील त्यांच्या प्रमुख मागण्या या पंढरीनाथ तुकाराम जाधव उपशिक्षक अनुदानित आश्रम शाळा खुडेद तिवस पाडा तालुका विक्रमगड यांना तात्काळ कामावर हजर करण्याचे आदेश देण्यात यावे, शिवाय या शिक्षकांना सन 1999 पासून चे रखडलेले वेतन व इतर भत्ते तातडीने अदा करण्याचे आदेश देण्यात यावेत.या व इतरही काही मागण्या आंदोलकांनी करून जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यालयाच्या दालनामध्ये धरणे आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून सुरू असून मागण्या वेळेच्या मागण्या न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे आदिवासी दलित विद्यार्थी विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भिसे यांनी बजावले आहे.आंदोलकांत सुनील गावंडा आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.