
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पुणे :– शहरातील भाजीपाल्याची महत्त्वाची व बाजारपेठ असलेल्या मार्केट यार्डत कोकणातील हापूस आंब्याच्या पाच पेट्या दाखल झाल्या आहेत. या सिझनमधील पाचवी आवाक आहे. या पाच डझन आंब्याच्या एक पेटीला तब्बल 31 हजार रुपये याप्रमाणे पाच पेटयांना इतका विक्रमी भाव मिळाला आहे. पुण्यातील मार्केट यार्डात जानेवारीत पहिल्यांदा आंबा येतो. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्याच्यात थोडी वाढ होते, अन मार्च महिन्यात आंब्याचा खरा सिझन सुरु होतो.
मार्केट यार्डातून दरवर्षी – कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. आजच्या हापूस आंब्याला मिळलेलीही सर्वात विक्रीमी बोली होते. मागील पन्नास वर्षतील सर्वात विक्रमी बोली असल्याचे माहिती मार्केट यार्डातील व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली आहे. तब्बल 1 लाख 24 हजार रुपयांच्या चार पेट्यांची विक्री झाली आहे. या हापूस व्यापाऱ्यांनी हार श्रीफळ फोडून या पेट्यांची पूजा करण्यात आली.
मागील दोन वर्षांत कोरोनाचा सर्वात मोठा फटका सर्वचा क्षेत्रांना बसला.या काळात आंब्याच्या सिझनचेही मोठे नुकसान झाले. याचा व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना मोठा फाटक बसला. मात्र यावेळी नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण नाही. अनेक लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे . त्यामुळे खरेदीसाठी तसेच विक्रीसाठीही बाहेर पडत आहेत. त्यामुळे यंदा आंब्याच्या सिझन निश्चितच दिलासादायक असणार आहे.