
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
एका भंगार विक्रेत्याने सरकारला तब्बल 100 कोटी रुपयांचा गंडा घातला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या भंगार विक्रेत्याने प्रत्यक्षात भंगार विक्रीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता हजारपेक्षा अधिक बनावट बिले तयार केली. या बनावच बिलांच्या सहाय्याने त्याने जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटद्वारे सरकारला सुमारे शंभर कोटीचा गंडा घातला.
सरकारला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील व्यापारी समीर मलिक याला केंद्रीय जीएसटी विभागाने औरंगाबादमधून अटक केली. समीर मलिक याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
यानंतर आता या घोटाळ्यात सहभागी झालेल्या वाळुज हनुमान नगर येथील एका भंगार दुकानावर सायंकाळी धाड टाकण्यात आली. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील भंगार विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.