
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
बहुतांश पालकांची एक तक्रार असते, ती म्हणजे मुले काही खातच नाहीत. मात्र, ‘जंक फूड’ किंवा बाहेरचं खायला त्यांना खूप आवडतं. मात्र, आरोग्यासाठी ते हानीकारक तर असतेच, शिवाय मुलांची भूकही नाहीशी होते.. मुलांना चांगली भूक लागावी, यासाठी खालील टिप्स वापरू शकता…
ओवा :- गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखीसारख्या आजारांवर ओवा चांगला उपाय आहे. कोमट पाण्यात ओव्याची पूड घालून मुलांना प्यायला दिल्यास त्यांची भूक वाढते.
वेलचीचं दूध :- मोठ्या वेलचीचे सेवन केल्यास पचनसंस्था चांगली राहते, भूकही वाढते. एक कप कोमट दुधात वेलची पूड मिसळून दररोज मुलांना दिल्यास त्यांची भूकही वाढेल.
आवळा नि मध :- रोज एक ग्लास पाण्यात आवळा किसून घाला व ते उकळा. नंतर त्यात मध घालून मुलाला प्यायला दिल्यास भूक वाढते.
चिंच :- चिंचेची चटणी किंवा चिंच पानांची चटणी मुलांना देऊ शकता. त्यामुळे जेवण चवदार होण्याबरोबरच भूक वाढवण्यासही मदत होईल.
बडीशेप आणि साखर – मुलांना बडीशेप व साखर मिसळून दिल्यास ते आवडीने खातात. मंद आचेवर बडीशेप भाजल्यास त्याचा चांगला वास येतो.
टीप – वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. डाॅक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.