
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादा लोखंडे
पावडेवाडी बु. येथे विकास कामासाठी वीस लक्ष रुपयांचा निधी
नांदेड :- उत्तर विधानसभा मतदार संघाचे आ. बालाजी कल्याणकर यांचे मतदार संघात अनेक ठिकाणी विकास कामे प्रगतीपथावर आहेत. पावडेवाडी बु. येथे त्यांनी वीस लक्ष रुपयांचा निधी दिला असून, त्यातून पेवर ब्लॉक व हायमास्ट चे काम प्रगतीपथावर आहे. त्यांनी याची शुक्रवारी पाहणी केली. यावेळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी जयंती असून जयंती पूर्वी हे काम पूर्ण झाले पाहिजे अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्यासोबत कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पावडे, जेष्ठ नागरिक संभाजी पावडे, बंडूभाऊ पावडे, संजय कारभारी, पप्पू पावडे, हरिभाऊ पावडे, उद्धव पावडे, धनंजय पावडे, संतोष भारसावडे, शंकर पावडे, साईनाथ पावडे, राजकुमार पावडे, मनोज पावडे यांच्यासह आदीजण उपस्थित होते. मतदार संघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी आपण दिलेले काम मजबूत तसेच टिकाऊ झाले पाहिजे, यासाठी आ. बालाजी कल्याणकर हे स्वतः प्रत्येक विकास कामावर जातीने लक्ष घालत असतात.
काम सुरू झाले की त्या कामाला दोन ते तीन वेळेस भेट देऊन कामाचे बारकाईने निरीक्षण करतात. कामात जर कुठे चूक होत असेल तर ती तात्काळ संबंधितांना सुधारण्याबाबत सूचना करतात. त्यामुळे मतदारसंघातील नागरिक देखील आनंद व्यक्त करत आहेत. नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांची मतदारसंघात अनेक विकास कामे सुरू आहेत. आगामी काळात देखील मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार आहेत.
पावडेवाडी बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पेव्हर ब्लॉक साठी स्थानिक आमदार निधीमधून दहा लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच याच परिसरात हायमास्ट लाईट बसवण्यासाठी पंचवीस- पंधरा योजनेअंतर्गत दहा लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून याची शनिवारी आ. बालाजी कल्याणकर यांनी गावकऱ्यांना समक्ष पाहणी केली आहे.