
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना होत आहे.
भारताने मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होत आहे. भारताने पहिला सामना सहा विकेटने तर दुसरा सामना 44 धावांनी जिंकला. फलंदाजांची कामगिरी अजूनही समाधानकारक नाहीय.
दोन्ही सामन्यात गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. त्यामुळे भारताला विजयी आघाडी घेता आली. शेवटच्या वनडेमद्ये शिखर धवन खेळणार असल्याचं कर्णधार रोहित शर्माने आधीच स्पष्ट केलं आहे. विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा चौथ्या स्थानावर फलंदाजीला येऊ शकतो.