दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार : आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र सरकारकडील विशेष साहाय्य योजनेंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या युवक व युवतींना वाहन चालक (हलके) प्रशिक्षण देण्यासाठी 12 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
वाहन चालक प्रशिक्षणासाठी अर्जासोबत जातीचा दाखला, आधार कार्ड, दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) दाखला, दिव्यांग दाखला, रहिवाशी दाखला तसेच शैक्षणिक कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील. अधिक माहिती व अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा जि. नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.