
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
प्रा.यानभुरे जयवंत
कंधारd :- कंधार तालुक्यातील कुरुळा सर्कल मधील दिग्रस बुद्रुक चे मूळ रहिवासी असलेले जोगपेटे रमेश गंगाधर यांनी समाजासमोर नवीन आदर्श ठेवला असून दिग्रस नगरीतील होतकरू , जिज्ञासू , अभ्यासू, ज्ञानपिपासू , जिद्दी आणि भविष्याच्या अचुक नेम साधणा-या तरुणांचा , युवकांचा अंतकरणातुन -हदयपुर्ण सत्कार करून सतत तरुणांना प्रोत्साहीत करत आसतात. त्याच अनुषंगाने दिग्रस येथील बालाजी होणराव या शेतकऱ्यांच्या मुलाचे अर्थातच माधव बालाजी होणराव यांची काल परवाच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ अर्थातच महावितरण कंपनीमध्ये नियुक्ती झाली हे देश सेवेतून सेवानिवृत्त झालेले जवान सैनिक तथा विद्यमान नांदेड पोलीस कर्मचारी रमेश गंगाधर जोगपेटे यांना समजली.
तेव्हा त्यांनी तात्काळ बालाजी होनराव यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांचा मुलगा माधव बालाजी होनराव यांचा शाल, श्रीफळ फेटा व पुष्पहार घालून सत्कार केला व पेढे भरवून अभिनंदन केले.
यापूर्वीसुद्धा प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव यांना 2021 चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रमेश गंगाधर जोगपेटे यांनी प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव यांचा भव्यदिव्य नागरी सत्कार सोहळा केला होता.
अशा विविध उपक्रमातून नवतरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी व नव्या पिढीच्या समोर एक नवा आदर्श ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य सेवानिवृत्त मिलिट्री मॅन तथा नांदेड चे विद्यमान पोलीस कर्मचारी रमेश गंगाधर जोगपेटे करत आहे त्यांच्या या कार्याचे कौतुक दिग्रस व दिग्रस परिसरात केले जात आहे.