
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- स्थानिक राजकारण्यांनी वडिलांचे निधन झाल्यानंतर 2019 मध्ये आपण उमेदवारी मागितली होती. ती नाकारली. या विधानसभा निवडणुकीत आपल्या बाजूने एक मूक लाट आहे, असा दावा अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांनी केला आहे.
वडिलांनी त्याग आणि कष्टातून सांभाळलेला पणजी मतदारसंघ कुणाच्या हातात कसा काय देणार आणि शरणागती पत्करावी हे शक्य नव्हते. यात मी शांतपणे बसू शकत नसल्याने आणि जनतेच्या पाठिंब्याने मला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले, अशी भावना दिवंगत भाजपा नेते उत्पल पर्रिकर यांनी व्यक्त केल्या आहेत.
भाजपाकडून सूचवलेल्या तीन जागांच्या पर्यायांबद्दल उत्पल म्हणाले की, मी कधीही पर्यायाला महत्त्व दिले नव्हते. चांगला उमेदवार दिल्यास रिंगणातून बाहेर पडेन, असे माझे मत होते. परंतु, तसे न झाल्याने जनतेच्या पाठिंब्यावरून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असेही उत्पल म्हणाले. दरम्यान, येत्या सोमवारी गोव्यात 40 जागांसाठी मतदान होणार आहे. सत्ताधारी भाजपा, काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग’ेस यांच्यासह महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, गोवा फॉरवर्ड पार्टी असे पक्ष राज्यात सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत.