
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
चंदीगड :=- भगवंत मान शुक्रवारी अमृतसर जिल्ह्यातील आपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी नागरिकांकडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. पंजाबमध्ये येत्या 20 फेब्रुवारीला विधानसभेच्या 117 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर राजकीय आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे.
प्रचार देखील शिघेला पोहचला आहे. यातच आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर रोड शो दरम्यान दडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. अमृतसर येथील अटारी भागातून भगवंत मान यांचा ताफा जात असताना अज्ञाताकडून त्यांच्यावर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये मान जखमी झाले आहेत.
त्याचवेळी गर्दीतील एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर दगड फेकण्यात आल्याने मान जखमी झाले. पंजाबमधील विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर निकाल 10 मार्चला निकाल लागणार आहेत. आपतर्फे भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आले आहे.