
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- भाजपसोबत आमची युती होती, त्यामुळे इतके दिवस आम्ही त्यांचा विचार करून निवडणूक लढवत नव्हतो. मित्र पक्षाला त्रास द्यायचा नाही, त्यांचा सीट शेअर कमी करायचा नाही असं आमचं धोरण होतं. मात्र भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे आता जिथे आमचं अस्तित्व होतं तिथे आता आम्ही पुन्हा तयारीला लागलो आहोत असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
आम्ही गोव्यात ११ जागा लढवत आहोत. घरोघरी जाऊन प्रचार केला जातो आहे. शिवसेनेचं जे काही असतं ते खुलेपणाने आणि पारदर्शकपणे असतं शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गोव्यात घेतली आहे. गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गोव्यात निवडणुकीच्या नंतर घोडेबाजार होऊ शकतो अशी शक्यता आहे त्यावर आपलं मत काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार भरत नसतो असं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं आहे. तसंच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत कारण आम्हाला इथल्या भूमिपुत्राचा विकास करायचा आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
.