
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
रामेश्वर केरे
औरंगाबाद :- गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे. येथील समाज हा आदिवासी, मागास व मोठ्या प्रमाणात अशिक्षीत आहे. नक्षलग्रस्त भागातील आदिवासी, मागास व अशिक्षीत लोकांची शिक्षणाप्रती सहानुभूती वाढविणे, नक्षलग्रस्त भागात नवनविन उपक्रम व संकल्पना राबविणे अत्यंत निकडीचे आहे. आदिवासी व मागास लोकांना मुख्यप्रवाहात कसे आणता येईल, आदिवासी व मागास लोकांमध्ये विकासाची गाथा कशी रुजवता येईल.
याचाच श्रीगणेशा म्हणुन “उत्प्रेक्षा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था” च्या वतीने जिल्हयातील सर्व ०९ सशस्त्र पोलीस दुरक्षेत्र येथे विवीध स्पर्धा परिक्षेचे अभ्यासासाठी येथील दुर्गम भागातील विदयार्थाना लाभ व्हावा म्हणून दूरक्षेत्राचे ठिकाणी सुरु असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे ठिकाणी अभ्यासाकरीता अशी ३३ पुस्तकांचे १० संच एकंदरीत सर्व अभ्यासक्रमांच्या पुस्तके आदिवासी व मागास शिक्षीत विद्यार्थ्यांकरीता अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सभागृह देवरी या ठिकाणी मोफत वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास सौ. प्रिया अशोक बनकर, श्री. विठ्ठल करंबळकर, वाचक, सपोनि अपर पोलीस अधीक्षक, देवरी श्री. संतोष बहाकर, प्रभारी अधिकारी, नक्षल ऑपरेशन सेल देवरी श्री. शशिकांत सैंदाणे, वाचक पोउपनि, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देवरी, श्री. मंगेश वानखेडे, पोउपनि. स.दु. गणूटोला तसेच सर्व सशस्त्र पोलीस दूरक्षेत्र, गोंदिया जिल्हा येथील प्रत्येकी ०२ अंमलदार उपस्थित होते.