
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई : बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आणि ममता सरकारमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, राज्यपाल जगदीप धनखर यांनी पश्चिम बंगाल विधानसभेचे अधिवेशन (अधिवेशन) अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा आदेश जारी केला आहे. स्वतः राज्यपालांनी ट्विटरवर हा आदेश शेअर करून ही माहिती दिली आहे.
राज्य सरकार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत होते त्याच दरम्यान राज्यपालांनी हे पाऊल उचलल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता राज्यपालांच्या परवानगीशिवाय विधानसभेचे अधिवेशन बोलवता येणार नाही. राज्यपालांनी या आदेशाविषयी ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटलय की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १७४ अन्वये राज्य विधानसभेचे अधिवेशन (संसद किंवा इतर विधानसभेचे अधिवेशन विसर्जित न करता) १२ फेब्रुवारी २०२२ पासून अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.