
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पणजी :- गोवा पोलिसांनी शुक्रवारी पर्वरीममधील अनेक बंगल्यांवर छापे टाकले. याठिकाणी 8 बंगले I-PAC ने भाड्याने घेतले आहेत. या छाप्यात आय-पीएसीच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे वय असून, पोलिसांनी त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गोव्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) राजकारणाची दिशा ठरवण्याचं काम सध्या राजनैतिक सल्लागार प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे.
प्रशांत किशोर यांची यांनी यासाठी जोरदार तयारी केली असून, आपल्या I-PAC या कंपनीच्या माध्यमातून ते मैदानावर काम करत आहेत. त्यातच आता एक धक्कादायक घटना समोर आली असून, त्यांच्या I – PAC संस्थेच्या आवारात पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला पर्वरीम (Porvorim) शहरातून अटक केली. आरोपींकडून गांजा जप्त करण्यात आला आहे.
गोव्यात 14 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तृणमूल काँग्रेससाठी राजनैतिक सल्लागार म्हणून काम करणारे प्रशांत किशोर गोव्यात तृणमुल काँग्रेससाठी काम करत आहेत.