दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
रामेश्वर केरे
औरंगाबाद :- सिंधी सिरजगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिंधी सिरजगांव येथे कार्यकर्ता मेळावा शनिवारी रोजी संपन्न झाला आहे. यावेळी मार्गदर्शक म्हणून पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे आयोजक म्हणून नुकतेच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करुन अविनाश सोनवणे पाटील यांनी हा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.परीसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने हा मेळावा आयोजित केला .
कार्यक्रमात राष्ट्रवादी युवा नेते अविनाश सोनवणे यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे सिंधी सिरजगांव फतुलाबाद येथे रस्ता,सिंमेटी पूल मागणी केली असता आमदार सतीश चव्हाण यांनी दिवाळीपर्यंत काम होऊन असे आश्वासन दिले आहे. गंगापूरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव,खादी ग्रामोद्योग अध्यक्ष संतोष माने, अंकुश काळवणे,फारुक चौधरी, अविनाश सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर निळ, अनिल पोळ,काळे गुरुजी,अमोल जगताप,युनूस शेख, प्रकाश सोनवणे, भगवान सोनवणे, योगेश नरोडे,अमोल सोनवणे, विजय सोनवणे, वाल्मिक सिरसाठ,कडूबा हिवाळे, सुनील सोनवणे,रवि सोनवणे, रामेश्वर वाकळे,अजय सोनवणे,नंदू आबासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..