
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
पणजी :- आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपच्या (BJP) मुख्य प्रवक्त्यांनी चक्क शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गुप्त भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची गुप्त भेट घेतली आहे. देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तर येत्या काळात मुंबईसह राज्यातील इतरही मनपा निवडणुका होणार आहेत.
पणजीमधील मँरिएट हाँटेलमध्ये केशव उपाध्ये आणि संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली आहे. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गोवा विधानसभा निवडणुक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या राजकीय भेटीमुळे गोव्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. पुन्हा युती? चर्चांना उधाण 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर वारंवार टीका करताना दिसतात. मात्र, आता आगामी निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये झालेल्या या गुप्तभेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.