
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- aमद्यपान करून शिवजयंती साजरी करु नका छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या अंतःकरणात रूजवा असे प्रतिपादन नादब्रह्म सदानंद महाराज रायवाडीकर यांनी शिवकल्याण नगर लोहा येथील अखंड हरिनाम सप्ताहात केले.
लोहा शहरातील शिवकल्याण नगर येथे विराट विश्वकर्मा जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी सुप्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते संगित विशारद, भागवताचार्य नादब्रह्म हभप सदानंद महाराज रायवाडीकर आपल्या किर्तनात प्रवचन करताना म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन केले.
गोरगरीबांना , शेतकऱ्यांना न्याय दिला. माता भगिनी चे रक्षण केले असा लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशात होऊन गेले त्यांचे विचार प्रत्यकांने अंगिकारले पाहिजे असे नादब्रह्म सदानंद महाराज रायवाडीकर म्हणाले.