
दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी
दिगंबर वानखेडे
लोहा :- लोहा तालुक्यामध्ये आनंदा मारुती वानखेडे वय वर्षे 48 शेतकरी यांनी आत्महत्या केवळ कर्जाला कंटाळून केलेली आहे या सरकारला हाक देण्यासाठी चिंचेच्या झाडावर जाऊन चाळीस फुटावर उंचीवर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.तरी या सरकारला जाग आलेली नाही. आज पंधरा दिवस झाले शेतकऱ्यांना आत्महत्या करून त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी कोणताच प्रशासन व कोणताही राजकारणी नेता आलेला नाही. ह्या राजकारणी लोकाला निवडणुकीसाठी मतदाराची तेवढी गरज आहे .त्यांच्या मतदानासाठी घराला गिरक्या घालत असतात.
शेतकऱ्यांनी कर्जासाठी आत्महत्या जर केली त्याला सुद्धा फिरुनी विचारीत नसतात ,राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा उद्देश असतो. मयत आनंदा मारुती वानखेडे यांनी भारतीय स्टेट बँकेचे शाखा लोहा. यांचे पीक कर्ज घेतलेले होते मात्र काही बँकेच्या चुकीमुळे काही शेतकऱ्याचे कर्ज माफ झालेले नाहीत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली शेतकऱ्यावर जर वेळ आली तर कोणताही पुढारी नेता राजकारणी हा कोण आहे कोणताही भाग त्याच्यात घेत नाही स्वतः शेतकऱ्याला आत्महत्या करूनच मरावं लागतं मदतीचा हात त्यांना कोणीही घेत नाही. असं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.