
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
लोणी हवेली/पारनेर :- तालुक्यातील लोणी हवेली या गावात जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्या नवीन इमारत बांधकाम करणे करिता जिल्हा परिषद प्रा. शाळा लोणी हवेली गावठाण करीता दोन व खडक वस्ती करिता एक अशा तीन शाळा खोल्या नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी २८.५० लक्ष रुपयांचा निधी व लोणी हवेली ते पारनेर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणेकरिता १५ लक्ष, रामा-६८ ते पाझर तलाव वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे करता १५ लक्ष अशा एकूण ८८.५० लक्ष रुपयांचा निधी लोणी हवेली साठी दिल्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून आभार मानण्यात आले.
यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना सभापती दाते सर म्हणाले की, लोणी हवेली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली होती व लहान लहान मुलांना बसण्यासाठी गावांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुसकान होऊ नये म्हणून ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांच्या मागणीला प्रथम प्राधान्य देऊन आवश्यक असलेल्या तिनही शाळाखोल्या मंजूर केल्या आहेत.या नविन खोल्यांचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचे यावेळी बोलताना सभापती दाते यांनी सांगितले.
लोणी हवेली गावातील शाळा खोल्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न तसेच रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार असे सभापती दाते सर यांनी आम्हाला दोन महिन्यापूर्वी शब्द दिला होता तो शब्द सरांनी पाळला असून या शाळाखोल्या इमारतींमुळे गावच्या वैभवात भर पडणार आहे.लोणी हवेली पारनेर रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून त्या रस्त्याला मोठे खड्डे पडलेले आहेत.दळणवळणाच्या या दृष्टीने दोन्ही रस्ते अतिशय महत्वाचे असून त्या रस्त्यावर निधी उपलब्ध केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान असल्याचे असे प्रतिपादन जिल्हा भाजप उपाध्यक्ष सुभाष दुधाडे यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खेडकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, मा. चेअरमन कृष्णाजी कोल्हे, चेअरमन रमेश तात्या कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी थोरे, शिवसेना विभाग प्रमुख संभाजी थोरे इ. मान्यवर उपस्थित होते