
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
पुणेगाव :-पुणेगाव येथील त्यागी महाराज व बळीराम पाटील व अन्य चौघेजण उत्तर प्रदेश येथे काशी दर्शनासाठी गेले होते. व दोन-तीन दिवस राहून परत येत असतांना त्यांचा मध्यप्रदेशातील जबलपूर नजीक अपघात झाला. उभ्या असलेल्या कंटेनरवर त्यांची सफारी गाडी क्रमांक एम.एच.26, 7133 धडकली व यामधील त्यागी महाराज व बळी पाटील पुयड जागीच ठार झाले . या अपघातात अन्य तिघेजण जखमी झाले होते.त्यानी बालाजी पुयड पुणेगावकर याना भ्रमणध्वनीवरून अपघाताची माहिती कळवली व बालाजी पुणेगावकर यानी खासदार चिखलीकर साहेब यांची मदत घेतली.
खासदार साहेब यांनी त्यांचे लोकसभेचे सहकारी जबलपूरचे खासदार राकेशसिंग यांच्याशी संपर्क साधून, ज्या पोलिस ठाण्याच्या हदित अपघात झाला. जबलपूर पोलिस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधून शिवार ठाण्याचे पोलिस निरीक्षक शर्मा यांच्याशी खा.चिखलीकर साहेब यानी संपर्क साधून जखमी लोकाना दवाखान्यात भरती करण्यासाठी,व मृत त्यागी महाराज व बळीराम पाटील यांचे मृतदेह खासगी वाहनातून पुणेगावकडे रवाना करण्यासाठी सांगितले.त्यानंतर शिवार ठाण्याचे पोलिस निरीक्षक शर्मा साहेब यानी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.व पार्थिव खाजगी ऑम्बुलसने पुणेगाव नांदेड येथे रवाना केले अशी अपघात कार्यात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी मदत केली व पुणेगावकर यांचे सांत्वन केले.