
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
अहमदनगर :- पोलीस अधीक्षक पाटील यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या किर्तनाच्या सीडी बनवण्याबाबत एका कंपनीला अधिकार दिले आहेत.
परंतु संबंधित कंपनी त्या अधिकाराचा गैरवापर करीत आहे, अशी महाराजांची तक्रार आहे. यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. महाराजांनी याबाबत माध्यमांशी बोलण्याचे टाळले असले तरी याप्रकाराची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. इंदुरीकर महाराज हे शुक्रवारी अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयात आले.
समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आले होते. माझ्या संमतीविना किर्तनाच्या सीडी प्रसारित होत असून, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.