
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधि
मारोती बा.कदम
वडेपुरी :- प्रविण साले यांच्या अध्यक्षतेखाली व धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या संयोजनात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना प्रविण पाटील चिखलीकर साहेब जि.प.सदस्य यांच्याहस्ते राशन किटचे वाटप करण्यात आले. भाजपा महानगर नांदेड व लाॅयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने “मध्यवर्ती बस स्थानक नांदेड” येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस व्यंकट मोकले, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी ,व शितल खांडील, महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शितल भालके, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली देशमुख, चिटणीस शततारका पांढरे, केदार नांदेडकर, सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव, दिव्यांग मोर्चा जिल्हा संयोजक प्रशांत पळसकर, शिख सेल जिल्हा उपाध्यक्ष जसबीरसिंग धुपिया, भाजपा सक्रिय सदस्य कामाजी सरोदे, युवा मोर्चाचे रोहित पाटील व शंकर कल्याणकर, मारोतराव जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर दिनेशसिंह ठाकूर, नंदू पाटील बेंद्रिकर, कल्पना मोरे ,यांनी आपल्या भाषणातून एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. संयोजक दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, नांदेडसाठी लोकसहभागातून सातशे किट देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून आतापर्यंत पाचशे दोनची नोंदणी झाली आहे. अध्यक्षीय समारोप करताना प्रवीण साले यांनी एसटी कर्मचारी यांच्या पाठीशी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे सर्व सदस्य खंबीरपणे उभे राहणार असल्याचा निर्वाळा दिला. किट देण्यासाठी सहकार्य करणारे
किशनराव देशमुख बारडकर,महेश लहानकर, वैशाली देशमुख ,रत्नप्रभा गोपुलवाड,वसंत अहिरे,रमेश बाबासाहेब कांबळे, पुनमकौर धुपिया यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालाजी शिंदे यांनी केले.
या उपक्रमात मदत करणारे हॅप्पी वुमन्स बीसी ग्रुप, ॲड. चैतन्य बापू देशमुख ,स्नेहलता जयस्वाल,सतीश शर्मा,चंद्रकांत गंजेवार,शिवराज पाटील गोळेगावकर,डॉ. राजेंद्र मुंदडा,विश्वजीत मारुती कदम,बालाजी पाटील कार्लेकर ,श्याम लापशेटवार, सिद्राम दाडगे,अविनाश चिंतावार,डॉ. शैला कलंत्री, बालाजी बच्चेवार ,ॲड.सी.बी.दागडिया,नागनाथराव लाभसेटवार,मोहिते जयप्रकाश सोनी,गणेश भुसारी,रेणुका सोनी,नीरज अग्रवाल,वेंकट रावीकर,ढाणीवाला परिवार,अरुणा कुलकर्णी, शंकर कोटलवार यांचे
मीरा सूर्यवंशी गुणवंत मिसलवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भारती, रेखा सूर्यवंशी, सविता निलेवाड, रघुनाथ वाघमारे, रुपेश पुयड, एमडी गौस व शिवपुजे यांनी परिश्रम घेतले. यावेळी एसटी महामंडळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.