
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
शेंबा (नांदुरा)दि.12:- बुलढाणा अर्बन चे कर्मचारी संजय देविदास चौधरी रा. शेंबा यांचा मुलगा वैभव संजय चौधरी या विद्यार्थ्याने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत 720 पैकी 538 मार्क घेऊन यश संपादन केले. त्यामुळे त्याची महाराष्ट्रातील एन के पी साळवे मेडिकल कॉलेज नागपूर येथे एम. बी. बी. एस. साठी निवड झाली आहे.वैभव यांनी यापूर्वीही दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले होते. या निवडीमुळे वैभव चे व त्यांच्या आई-वडिलांचे सुद्धा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.