
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :- 12 भाजप आमदारांचे निलंबनामुळे हिवाळी अधिवेशनात देखील मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले होते.
तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील निलंबन कायदेशीर नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर हे निलंबन मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकारवर दबाव वाढत होता. विधानसभेत 5 जुलै 2021 रोजी ठराव संमत करून गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते.
यामध्ये आशीष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, संजय कुटे, अभिमन्यू पवार, हरिश पिंपळे, राम सातपुते, पराग अळवणी, नारायण कुचे, कीर्तिकुमार बागडिया आणि योगेश सागर यांचा समावेश होता. त्याविरोधात आशीष शेलार यांच्यासह अन्य निलंबित आमदारांच्या वतीने या ठरावाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती.