
दैनिक चालु वार्ता
मुखेड तालुका प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- क्रांतीसुर्य राष्ट्रीय संत श्री.सेवालाल महाराज यांची जयंती मुखेड शहरांमध्ये तालुक्यातील बंजारा समाज बांधव मोठ्याप्रमाणात साजरी करण्यासाठी यावर्षी संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदि आ.डॉ.तुषार भाऊ राठोड यांची तर सचिव पदी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री.शेषरावजी चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आज 12 फेब्रुवारी रोजी दुपारी ०३:००वा. मुखेड शासकीय विश्रामगृह येथे बंजारा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर, समाजांच्या आग्रहास्तव संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीची कार्यकारणी निवड करण्यात आली.
या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदि आ.डॉ.तुषार राठोड तर सचिवपदी इजि. शेषरावजी चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. येत्या २७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने मुखेड शहरात मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक, शैक्षणिक कलाकृती कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे.या जयंतीची नियोजन समिती ही गठीत करून जबाबदारी देण्यात आली आहे .
यावेळी एम.डी.राठोड, पि .पि.राठोड,गौवर्धन पवार,सुनिल राठोड वसुरकर,दिलीप चव्हाण,हरिलाल जाधव, विठ्ठल राठोड,अशोक चव्हाण,राम राठोड, अनिल राठोड, शिवाजी राठोड, इंजि.बालाजी जाधव, शिवाजी चव्हाण, शेषेराव राठोड, श्रिनिवास राठोड,अभय पवार ,राम पवार, सचिन चव्हाण, सुनिल राठोड, विकास पवार,राजु राठोड,सुनिल राठोड वसुरकर,सुधिर चव्हाण,किरण चव्हाण, वैभव राठोड, सचिन चव्हाण,विकास चव्हाण, विलास चव्हाण, पंडित राठोड,आशिष चव्हाण, अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत होते.