
दैनिक चालु वार्ता
मंठा :- शहरात गोल्डन आयुर्वेदिक- यूनानी नेचुरल दवाखानाचा उद्घाटन प्रसंगी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाली.डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकय अधिकारी डॉ. पृताप चाटसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मोईनोद्दीन लाला खाॅनसाहब डॉ. विजय राठोड, डॉ.नासर चौधरी, डॉ रमेश चव्हाण डॉ. स्वप्नील वायाळ शबाब कुरैशी, डॉ. किशोर त्रिभुवन, मुफ्ती आरेफ फलाही ,जेष्ठ पत्रकार डॉ. धोंडोपंत मानवतकर , मुसा भाई कुरेशी, शबाब कुरेशी, फहीम अन्सारी, रफीक सय्यद,. भिमराव वाघ, दिनेश जोशी, कृष्ण भावसार , राजेभाऊ भुतेकर काका, नागेशाराव कुलकर्णी , रंजित बोराडे , अतुल खरात यांची प्रमुख्य उपस्थिती होती.
याशिबिरामध्ये त्वचारोग, पोटाचे आजार कावीळ, सांधेवात व गुडघेदुखी, ऍसिडिटी, फिशर मुळव्याध, डायबिटीज, वात, पित्त, कफ, मणक्याचे विकार, मुतखडा, दमा, एलर्जी, जुनाट सर्दी खोकला बी पी शुगर, थायरॉइड, इत्यादी आजारांवर मोफत तपासण्या करण्यात आल्या. आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये आरोग्याची हेळसांड होत आहे.म्हणून सामाजिक संघटनांनी असे मोफत शिबिर वेळोवेळी ठेवणे काळाची गरज आहे. आरोग्य तपासणी करण्यास ग्रामीण भागांमध्ये महिला व पुरुष टाळाटाळ करतात, म्हणून गोल्डन आयुर्वेद युनानीचे उद्घाटन प्रसंगी हाफेज शबाब यांचा तर्फे आरोग्य तपासणीचे खर्च मोफत करून हे आरोग्य शिबीर ठेवण्यात आली होती.
हाफेज शबाब काश्फी यांनी अत्यंत गरीबी परिस्थितीमध्ये जाण आसल्यामुळे मंठा शहरात स्वतःचा गोल्डन आयुर्वेदिक – युनानी नेचुरल दवाखाना सुरू केले. ग्रामीण भागामध्ये लोकांना आर्थिक परिस्थीमुळे आयुर्वेदीक औषध उपचार मिळत नाहीत म्हणुन यापुढेही त्या ग्रामीण भागामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. या मोफत आरोग्य शिबीरात जी. एम.पी पुरस्कार प्रधान डॉ. सय्यद अकरम (युनानी तज्ञ एमडी मुंबई ) डॉ. नदीम अख्तर खान , हाकीम हाफेज शबाब काश्फी, यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रुग्णांची मोफत तपासणी आणि सल्ला देण्यात आला.
या आरोग्य शिबीरामध्ये एकुण 109 शिबिरार्थीनी लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मुफ्ती नदीम, मुफ्ती कुद्दुस हाफीज़ कलीम शाह, अवेस शेख असद बागवान, इमरान बागवान, नजिर कुरेशी, यांनी अथक परिश्रम घेतले. हाफेज शबाब काश्फी यांनी अत्यंत गरीबी परिस्थितीमध्ये जाण आसल्यामुळे नेचुरल आयुर्वेदिक युनानी आरोग्य क्षेत्रात सेवा देण्यासाठी मंठा शहरात स्वतःचा गोल्डन आयुर्वेदिक – युनानी नेचुरल दवाखाना सुरू कले. ग्रामीण भागामध्ये लोकांना आर्थिक परिस्थीमुळे आयुर्वेदीक औषध उपचार मिळत नाहीत म्हणुन यापुढेही त्या ग्रामीण भागामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले.