
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
निवडणुकीच्या काळात नेते मंडळींचे उंबरे झिजवणा-या शेतकरी संघटना गरजेच्या वेळी मात्र गायब
वडगाव सावताळ/गाजदीपूर :- वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे वडगाव सावताळ परिसरातील शेतकरी वैतागले आहेत. महावितरण कंपनी मात्र शेतकऱ्यांना वेठिस धरुन पिके उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहे. नैसर्गीक आपत्तींमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आलेला आहे,त्यातच महावितरण च्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांची वाट लागली आहे.शेतक-यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही.वडगाव सावताळ ग्रामपंचायत, सरपंच मिठुशेठ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब ज्ञानदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टाकळी ढोकेश्वर महावितरण कंपनीचे उप अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
महावितरण कंपनीने वीज पुरवठा योग्य दाबाने व सुरळीत चालू न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे, सरपंच मिठुशेठ शिंदे, उपसरपंच सौ.रुपाली संपत वाणी, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन सर्जेराव रोकडे सर, राजेंद्र बाळासाहेब रोकडे, गोरक्ष रोकडे गुरुजी, मंगेश रोकडे, दादाभाऊ रोकडे, अनिल गायकवाड, संदिप खंडाळे, अर्जुन रोकडे, योगेश शिंदे,भाऊ शिंदे, निवृत्ती शिंदे, पप्पू रोकडे, तुकाराम साळुंखे, बाळासाहेब झावरे, भाऊसाहेब खामकर, सत्यवान शिंदे, बबनराव रोकडे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.