दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि बारामती
रियाज़ शेख
बारामती :- राजीव गांधी सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी कमिशन’ व ‘टाटा ट्रस्ट’ यांच्या मदतीने माळेगांवमध्ये (बारामती) ‘कृषि विज्ञान केंद्रा’च्या आवारात राज्यातील पहिलं ‘सायन्स ॲन्ड इनोव्हेशन ॲक्टीव्हीटी सेंटर’ उभारण्यात आलंय. या सेंटरला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय रविंद्र सामंत साहेब यांनी भेट दिली.
काळाची गरज ओळखून इथं सुरु केलेल्या ‘व्हर्च्युअल लॅब’चंही त्यांनी उद्घाटन केलं. तसंच खेळाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने विज्ञान समजून घेता यावं यासाठी उभारलेल्या ‘फन सायन्स गॅलरी’लाही भेट दिली. यावेळी वखार महामंडळाचे MD दीपक तावरे, *#KVK* चे चेअरमन राजेंद्र दादा पवार उपस्थित होते.