
दैनिक चालु वार्ता
पुणे :- नुकत्याच झारखंड, रांची येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ४४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांकासहित सुवर्णपदक विजेता पै.धनराज शिर्के याचा पद्मावती वृतपत्र विक्रेता विभागाकडून धनकवडी,तानाजीनगर येथील त्याच्या राहत्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला.धनकवडी येथील जयनाथ तालीम संघाचा एक उत्कृष्ट कुस्तीपटू म्हणून धनराजने कमी वयात आपल्या सर्वोत्तम खेळाच्या बळावर आजवर अनेक स्पर्धा जिकल्या असून पारितोषिकेही मिळविली आहेत.
आपल्या खेळाने त्याने कुस्ती क्षेत्रातील अनेक नामवंताकडुन कौतुकाची थाप मिळविली आहे त्यामुळेच त्याची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ४४ किलो वजनी गटात निवड करण्यात आली होती आपल्या उत्कृष्ट खेळाने त्याने आपली निवड सार्थ ठरविली व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ४४ किलो वजनी गटात प्रथम क्रमांकासहित सुवर्णपदकाची कमाई केली त्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरामधून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. धनराजच्या या दैदिप्यमान आणि अभिमानास्पद कामगिरीचे कौतुक करण्यासाठी पद्मावती वृतपत्र विक्रेता विभाग आणि युवा संघ पुणे शहराच्या वतीने पैलवान धनराज शिर्के याचा त्याच्या धनकवडी, तानाजीनगर येथील राहत्या घरी जाऊन शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला व त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी या वेळी पद्मावती वृत्तपत्र विभागप्रमुख,कार्यकारी सदस्य,आणि विक्रेते बंधू तसेच पै.धनराज शिर्के यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.