
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- पुष्पा चित्रपटाचे धमाकेदार संवाद, धमाल गाणी आणि त्याच्या हटके स्टाईलनं सोशल मीडियावर लोकांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर दररोज काही ना काही ट्रेंड सुरू असतात. अशातच ‘श्रावल्ली’ या गाण्याच्या हुक स्टेप्सचा ट्रेंड इंस्टाग्रामवर सुरू आहे. चित्रपट रिलीज होऊन जवळपास दोन महिने झाले आहेत. दक्षिण भारतीय सिनेमासृष्टीतील स्टार अल्लू अर्जनचा ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटाची क्रेझ केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर जगभरात पहायला मिळत आहे. सुरतच्या प्रसिध्द कापड बाजारातही ‘पुष्पा’ ची क्रेझ पहायला मिळाली. व्यापारी ‘पुष्पा’चं प्रिंटसह साड्या विकत आहेत.
‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाची लोकप्रियता पाहता आता पुष्पा राज ( अल्लू अर्जुन ) आणि श्रीवल्ली (रश्मिका मंदाना) यांची साडी चर्चेचा विषय बनला आहे. चरणपाल यांनी सुरूवातीला दोन साड्या आणल्या यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. लोकांमध्ये या साड्यांना खूप मागणी असल्याचा दावा केला जात आहे. त्याला देशाच्या विविध भागातून ऑर्डर मिळू लागल्या. दरम्यान, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहार या राज्यातील कापड व्यापऱ्याकडून ‘पुष्पा साडी’ च्या ऑर्डर मिळत आहेत. त्यामुळे आता पुष्पा साडीचंही वेड लागल्याचं पहायला मिळत आहे.